नळ योजनेच्या खोदाईमुळे रस्ता खचला ; भरलेला वाळू डंपर पलटी

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 17:20 PM
views 289  views

कुडाळ : माणगाव बाजार ते तळीवाडी रस्त्यावर कवीटकर यांचे घरासमोर जल जीवनसाठी घातलेल्या नळ योजनेमुळे रस्ता खचून वाळू भरलेला डंपर पलटी झाला. मात्र या अपघातात वाहनाचे नुकसान झाले.

माणगाव बाजार ते तळीवाडी या रस्त्याच्या बाजूला जलजीवन योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली होती. या पाईपलाईन मुळे कवीटकर यांचे घराजवळ रस्ता खचला होता.या ठिकाणी अपघात होणार म्हणून ग्रामस्थांनी संबंधित विभाग व ग्रामपंचायत यांना कळविण्यात आले होते आज रविवारी सकाळी तळीवाडी येथील संगम भगे हे आपल्या मालकीचा डंपर घेऊन येत असताना रस्त्याच्या डाव्या बाजूस डंपर साईडपट्टीला रूतल्यामुळे शेतात पलटी झाला या डंपरमध्ये वाळू भरलेली असल्यामुळे डंपर चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र उजव्या बाजूला हा डंपर पडला असता तर त्यात जीवित हानी झाली असती.

माणगाव गावात आणि अनेक ठिकाणी रस्त्ता खोदून नळ पाणी योजनेची पाईप लाईन घालण्यात आली आहे. त्यामुळं वाहन चालक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.यामुळे जलजीवन योजना नक्की कशासाठी आहे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.