
देवगड : देवगड मधील मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे २०० मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. तसेच रस्त्याकडेची सर्व माती नागरिकांच्या घरा घरात घुसली शनिवारी दुपार च्या वेळी ३.३० वा.जवळजवळ तास दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता अक्षरशः उखडून वाहून गेला आहे.या रस्त्याचे नूतनीकरण सुमारे दोन वर्षापूर्वीच करण्यात आले होते.या घाटीरस्त्याच्या बाजूला सुमारे चार ते पाच फूटाचा चर पडून तेथील माती पाण्याच्या बदलेल्या प्रवाहाने नजीकच्या घरांमध्ये घुसली.देवगड तालुक्यात शनिवारी सकाळपासून पावसाने सुरूवात केली व या पहिल्याच पावसात मोंड गावातील रस्ताच वाहून गेला आहे. या गावातील मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे दीड कि. मी. चा डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहून गेला आहे. या रस्त्यावरील घाटीरस्ता अक्षरशः उखडून गेला आहे. या घाटीरस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः पाण्यात वाहून गेले आहे. या रस्त्यानजीक जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी गटारे खोदण्यात आली होती. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या गटारात पावसाचे पाणी अडून घाटीरस्ता उखडून गेला आहे.
शेतकऱ्यान ची या रस्त्यावरून ये जा सुरू असते घाटीची वाहून गेलेली माती घरांच्या मागील दाराने लोकांच्या घरात घुसली या गावातील वाडी मद्ये घाटी चा हा रस्ता असून चालणेही मुश्किल झाले आहे. या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला स्थानिक नागरिकांन कडून देण्यात आली आहे.
रस्त्यानजीक चार ते पाच फूटाचे चर पडले असून नजीकच्या वाडीत या चराची माती पाण्याच्या बदलेल्या प्रवाहाने वाहून जात तेथील घरांच्या मागील बाजूने घरात घुसली आहे.यात सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली आहेत.