दारूची नशा डोक्यात गेली | दोन गटांत हाणामारी झाली

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 24, 2024 10:45 AM
views 924  views

देवगड : देवगड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या तळवडे येथील न्हाव्हणकोण्ड धबधब्यावर पावसाळी पर्यटणाच्या पहिल्याच शनिवारी जोरदार हाणामारी झाली. मद्यधुंद  अवस्थेत असलेल्या देवगड व शिरगांव मधील पर्यटकांच्या दोन गटा मध्ये मुख्य प्रवाही धबधब्याच्या ठिकाणी जोरदार राडा झाला. यावेळी 60 ते 70 पर्यटक  उपस्थित होते.

यावेळी गावातील ग्रामस्थांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण मध्यधुंद अवस्थेतील पर्यटक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारामुळे गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अशा पर्यटकांमुळे तळवडे गावातील शांतता धोक्यात येत असेल व शासन आणि पोलीस प्रशासन कोणतीही दखल घेऊन मोठी कारवाई करत नसेल तर नाविलाजस्तव हा धबधबा बंद करावा लागेल असा इशारा भाकरवाडी युवक क्लब तळवडेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद दुखंडे यांनी दिला आहे. तरी पोलीस प्रशासन आणि पर्यटन विभागाने याची योग्य ती नोंद घ्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी तेथे उपस्थित ग्रामपंचायत कर्मचारी जयेश जाधव यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेची देवगड पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही नोंद झालेली नाही.