
दोडामार्ग : जिल्हा पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग व पोलीस स्टेशन दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत नशा मुक्त भारत पंधरवडा आज 26 जून रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांमुळे होणारे नुकसान व अमली पदार्थांची तस्करी केल्यास कोणकोणते गुन्हे नोंद होतात याची ओळख करून दिली. तसेच श्री ओतारी यांनी नशा मुक्ती वर स्वरचित कविताही विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री साळगावकर सर पोलीस ठाण्याचे दोडामार्गचे उपनिरीक्षक आशिष भगत व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ए एल बामणीकर सर यांनी केले.