
दोडामार्ग : तालुक्यात कहर केलेल्या पावसाने कुडासे भरपाल येथील जांग्याची तळी कोसळ्यामुळे येथील लोकांचे पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल झाले आहेत. त्याच ठिकाणी नळयोजनेचे सुरु असलेले काम हे धीम्या गतीने सुरु असल्याने आता ग्रामस्थांना पावसाचे पाणी प्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
2019 मध्ये कुडासे भरपाल येथील जांग्याची तळी कोसळी होती. यावेळी या तळी ला दुरुस्त करण्यासाठी शासनाने कोणतीच मदत केली नव्हती. त्यामुळे येथील लोकांनी आर्थिक दृष्ट्या स्वखर्चातून तळीचे काम केले होते. मात्र दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसात ही तळी कोसळून पडली. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल झाले. याला सर्वस्वी नळयोजनेचे धिम्या गतीने काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे येथील ग्रामस्थांना पावसाचे पाणी पिण्याची वेळ आज आली आहे.
तात्काळ निधी द्यावा : रामदास मेस्त्री
दरम्यान भर पावसात कोसळलेल्या तळीच्या नळयोजनेच्या कामाची चौकशी करून तात्काळ तळी दुरुस्त करण्यासाठी निधी द्यावा व सध्या पावसावर अवलंबून असलेल्या नागरिकांना नळयोजनेचे पाणी पिण्यासाठी द्यावे असे येथील ग्रामस्थ रामदास मेस्त्री यांनी सांगितले.