डॉ. वसंत करंबेळकर हरपले

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 08, 2025 22:11 PM
views 185  views

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ वालावल येथील डॉ. वसंत लक्ष्मण करंबेळकर, वय ८३वर्षे  यांचे मंगळवार ८/०७/२०२५ रोजी संध्याकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले.  त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या बुधवारी ९ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहेत.  

डॉ. वालावल पंचक्रोशीचे डॉक्टर म्हणून दीर्घकाळ सेवा देत आले आहेत. नेरूर येथील इन्गेट्राउट हॉस्पिटल मधेही त्यांनी अनेक वर्षे सेवा दिली. फॅमिली डॉक्टर या संकल्पनेतील शेवटच्या काही डॉक्टर मधे त्यांचा समावेश करावा लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. कुडाळ मधील आरोग्यधाम च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सौ रसिका यांचे ते सासरे तर पतंजली औषधालयाचे मालक आणि कृषी सल्लागार विद्याधर करंबेळकरचे ते वडील होत. त्यांचा धाकटा मुलगा संदेश शेती तज्ञ व भाजपा कार्यकर्ता आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे विद्याधर व संदेश व कन्या सौ. प्रज्ञा जोशी,(अहमदाबाद, गुजराथ) व डॉ. निलिमा केळकर व जावई, सुना, नातवंडे आहेत.