डॉ. आंबेडकर जयंतीदिनी कणकवली पटवर्धन चौकात विविध कार्यक्रम...!

Edited by:
Published on: April 13, 2024 10:12 AM
views 159  views

कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कणकवलीच्या वतीने उद्या कणकवली पटवर्धन येथे विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 11 वाजता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल या कार्यक्रमाला कणकवली शहरातील शासकीय अधिकारी तसेच वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील  प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर व प्रा. डॉ. सोमनाथ कदम,ऍड. संदिप वंजारे,मा.आनंद कासारडेकर हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

गेली तीन वर्ष 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही पटवर्धन चौकामध्ये उत्साहात साजरी होत असते .आणि यावेळी या ठिकाणी कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी तसेच सर्वसामान्य जनता या मंचावर येऊन बाबासाहेबांबद्दल आपले ऋण व्यक्त करून त्यांना अभिवादन करत असते. या मंचावर वेगवेगळे प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरे केले जातात हा सर्वांसाठी खुला मंच असल्याने या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.हा खुला विचारमंच लोकांच आकर्षक ठरत आहे. तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व प्रबोधनाच्या कार्यक्रम पाहण्यासाठी बहुसंख्य जनतेने उपस्थित राहावे .असे आवाहन समितीच्या वतीचे मुख संयोजक ॲड सुदीप कांबळे, सचिन तांबे,रोहित राणे. विश्वनाथ कदम यांनी केले आहे .