डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2025 20:06 PM
views 42  views

सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्तुत्य उपक्रम राबवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे. प्रतिष्ठानने गणेशभक्तांना निर्माल्य आपल्या कक्षात जमा करण्याचे आवाहन केले. सावंतवाडी मोती तलाव येथील विसर्जनस्थळी हा उपक्रम प्रतिष्ठानच्यावतीनं राबविण्यात आला. 


या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणेशोत्सवातून मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि त्यापासून खत तयार करणे हा आहे. हा उपक्रम सावंतवाडी येथे यावर्षीही यशस्वीरित्या राबवण्यात आला. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकत्र गणेशभक्तांकडून निर्माल्य गोळा केले. त्यापासून आता खतनिर्मितीची प्रक्रिया पार पडणार आहे. या उपक्रमातून श्री सदस्यांनी गणेशभक्तांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी ? याचा आदर्श घालून दिला. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सुरू केलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणतो. यामुळे नदी, तलाव, जलाशयात निर्माल्य टाकून होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होते. त्याचबरोबर खत तयार होऊन  त्याचा उपयोगही करता येतो.