शिवाजी चौक मित्र मंडळाकडून डॉ. ऐवाळे यांचे स्वागत

Edited by: विनायक गावस
Published on: July 03, 2023 14:16 PM
views 303  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज नव्याने स्त्री रोग तज्ञ म्हणून हजर झालेले डॉक्टर ऐवाळे यांचे रुग्णालयातील कार्यालयांमध्ये जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, उपाध्यक्ष बंड्या तोर्षेकर, विजय पवार, संजय साळगावकर, संतोष मिस्त्री, मार्टिन अलमेडा, सत्यवान राऊळ हे उपस्थित होते.

डॉक्टर दुर्भाटकर यांच्या निवृत्तीनंतर डॉक्टर येवले यांना सावंतवाडी येथे आणा अशी मागणी सर्वात प्रथम माजी नगरसेवक सुरेश भोगटे विलास जाधव यांनी केली होती. तसेच आज दिनांक तीन रोजी डॉक्टर येवले हे उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यभार सांभाळण्यासाठी हजर झाले. त्यावेळी त्यांचे सावंतवाडी येथे स्वागत करण्यात आले. भविष्यात चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.