सावंतवाडी शहर भाजपा महिला मोर्चातर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

शहर मंडल महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केला पुष्पहार अर्पण
Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2023 17:47 PM
views 155  views

सावंतवाडी : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती सावंतवाडी शहर भाजपा महिला मोर्चातर्फे साजरी करण्यात आली. भाजपच्या शहर मंडल महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सावंतवाडी शहरात झालेल्या रॅलीमध्येही महिला मोर्चाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी मोहिनी मडगावकर यांच्यासह मिसबा शेख, मेघना साळगावकर, सविता टोपले, ज्योती पाटणकर यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.