डॉ. संजय भावे यांची कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

Edited by:
Published on: June 07, 2023 11:35 AM
views 97  views

सिंधुदुर्ग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यमान संशोधन संचालक डॉ. संजय भावे यांची दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी गुरुवारी ६ जुनला डॉ. भावे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. संजय सावंत यांचा कार्यकाल दिनांक 28 मे 2023 रोजी संपल्याने हे पद रिक्त झाले होते. एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ. संजय भावे हे सिंधुदुर्ग जिल्हयाचे सुपूत्र असून कोकण कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी याच विद्यापीठामधून अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन (Genetics and Plant Breeding) या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. गेली ३३ वर्षे ते या विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात सहाय्यक प्राध्यापक चा पदापासून केली. त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता (वनशास्त्र), संचालक, विस्तार शिक्षण, या पदांवर काम केले आहे. सध्या ते विद्यापीठामध्ये संशोधन संचालक या कार्यरत आहेत.