
चिपळूण : डॉ. सलोनी सतीश वाघ, मॅनेजिंग डायरेक्टर- सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड यांचा ‘तरुण तेजांकित २०२५’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. औषध निर्माण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली.
औषध निर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सलोनी सतीश वाघ, मॅनेजिंग डायरेक्टर- सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड यांना 'तरुण तेजांकित २०२५’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. एका मिडिया’ने आयोजित केलेल्या या उपक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या २० तरुण व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
डॉ. सलोनी सतीश वाघ, यांचे संशोधन आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे औषध निर्माण क्षेत्रात एक वेगळी छाप पडली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या एका भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हवा, पण त्यात अहंकार नको. समाजासाठी काम करताना नम्रता आणि सेवाभाव टिकवणं खूप महत्त्वाचं आहे.” ‘ तरुण तेजांकित’ या उपक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येक व्यक्तीची विविध निकषांवर कसून तपासणी करण्यात आली. डॉ. सलोनी वाघ यांचा प्रवास आणि कार्य नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल.