
सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम सावंतवाडीt मोठ्या उत्साहात झाला. राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये ५०० शिक्षकातून १० शिक्षक निवडण्यात आले.
पहिल्या टप्प्यातआदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून बांदा येथील गोगटे वाळके कॉलेजच्या डॉ. प्रा. रमाकांत गावडे यांचे नाव निवडण्यात आले. २८ फेब्रुवारीला हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. डॉ. रमाकांत गावडे हे गोगटे वाळके कॉलेज बांदा, राहणार चौकूळ, गेली २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असून आतापर्यंत शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात अनेक मुलांना मदत केली. तसेच मराठी शाळेतील मुलांना शासनाच्या दत्तक पालक योंजनेत प्रत्येकी 3000 रुपये भरून मदत केली. आतापर्यंत मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार, 2022-23 आणि 23-24 असा सलग दोन वर्ष उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र यांचा उत्कृष्ठ तालुका समन्वयक राज्यस्तरीय पुरुष्कार त्यांना मिळाला. अनेक सामाजिक कार्यात सहभाग अनेक संथाच्या अध्यक्ष मार्गदर्शक व सल्लागार म्हणून कामगिरी आणि शैक्षणिक कार्य याबाबत 2021-22 मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षक सेवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
गेल्या वर्षीच त्यांनी राजस्थान विद्यापीठात कोकणातील काजू कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या या विषयात Ph. D संपादन केली. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.