डॉ. राजेश गुप्ता - डॉ. विद्याधर तायशेटे जिजामाता आरोग्य केंद्र ओरोस येथे रूग्ण सेवेसाठी उपलब्ध..!

जिजामाता आरोग्य केंद्र ओरोस येथे अनुभवी तज्ञ डॉक्टरांची सेवा सुरू : ब्रिगे. सुधीर सावंत
Edited by:
Published on: October 03, 2023 13:53 PM
views 174  views

सिंधुदुर्गनगरी :  श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई  संचलित जिजामाता आरोग्य केंद्र, ओरोस येथे गेली अनेक वर्ष रुग्णांना आयुर्वेद चिकित्सा सेवा दिली जात आहे. आता नव्याने हॉस्पिटलची पुनर्बांधणी केली असून रुग्णांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून नव्याने जिजामाता आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. सर्व मेडिकल पॅथी म्हणजेच आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच ऍलोपॅथी, योग यांचा समन्वय करून रुग्णांवर उपचार केले जात असून  रुग्णांना या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. सध्या जिजामाता आरोग्य केंद्र, ओरोस येथे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, नेत्रतर्पण रक्तमोक्षण, शिरोधारा, स्नेहन (तेलाने मसाज) तसेच स्वेदन (वाफारा) या प्रकारच्या आयुर्वेदिक चिकित्सा माफक दरात दिल्या जात आहेत. या सेवांचा रूग्णांना फायदा होत आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून नामांकित डॉ. राजेश गुप्ता(B.A.M.S)  व डॉ. विद्याधर तायशेट्ये M.S.(सर्जन) हे अनुभवी व तज्ञ डॉक्टर आठवड्यातून एकदा रुग्ण तपासणीसाठी जिजामाता आरोग्य केंद्र ओरोस येथे येणार आहेत. सध्या या आरोग्य केंद्रामध्ये डॉ. बाळकृष्ण प्रभूदेसाई (B.A.M.S.) हे  आयुर्वेद उपचार देतात. ते सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कायम उपलब्ध असतात. हे आरोग्य केंद्र जिजामाता फार्म ओरोस, राष्ट्रीय महामार्ग नजीक अध्ययावत पद्धतीने सुरू आहे.  मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जिल्ह्यातील  गरजू रुग्णांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. रूग्ण सेवेसाठी  डॉ. बाळकृष्ण देसाई 7083858712 व नेताजी पालकर 9404164650 यांच्या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क साधावा.