...म्हणून मला पेटंटकर म्हणतात !

आपलं ज्ञान एकतर डोक्यात किंवा पोत्यात होतं : डॉ. रघुनाथ माशेलकर
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 20, 2023 12:25 PM
views 32  views

सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत ते 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. जीवनाच्या प्रयोगशाळेतील ज्ञान हे ज्ञान नाही का ? असा सवाल हळदीच पेटंट घेताना केला. जर खरचटलं, लागलं तर हळद लावणे हे आपले पारंपारीक ज्ञान आहे. जेव्हा यावर अमेरिका आपली हळद म्हणून भांडत होती त्यावेळी हेच सांगितलं. त्यावेळी आपले श्लोकही ट्रान्सलेट करून दिले. त्यामुळे ते हळदीच पेटंट आपल्याला मिळाल. आपलं ज्ञान एकतर डोक्यात किंवा पोत्यात होतं. पुढे असं कोणी होऊ नये म्हणून एक पारंपारीक ज्ञान लायब्ररी केली. आज त्यामुळे कोणीही आपल्या वस्तूंचे पेटंट सहजसहजी घेऊ शकत नाही. या लायब्ररीत लगेचच त्याची पडताळणी होते. म्हणून मला गंमतीने माशेलकर न म्हणता पेटंटकर म्हणतात असं मत अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं.