ही गोष्ट नातीकडून शिकलो !

डॉ. रघुनाथ माशेलकरांचा विद्यार्थ्यांशी संवाद
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 20, 2023 12:04 PM
views 65  views

सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत ते 1 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी लहान नातीकडून Z आणि N मधील साधर्म्य शिकलो. फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला, तुम्ही कोणत्या अँगलने बघता हे महत्वाचे आहे. आपण हे करत नाही म्हणून मतभेद आहेत. कारण, Z आणि N ला जेव्हा वेगळया अँगलने बघतो तो सारखाच दिसतो. बघण्याची दृष्टी पाहिजे. आज युक्रेन, हमास कशामुळे सुरु झालं ? मायक्रोसॉफ्टमध्ये या Z आणि N चा मुद्दा सांगितला. त्यांनी तोच मुद्दा दृष्टीकोन बदलण्यासाठी केला असं मत अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, कुटुंब वत्सलता महत्वाची आहे. आज न्यूक्लिअर फॅमिलीज होत आहेत. आयुष्यात मूल्य महत्वाची, त्याशिवाय आयुष्य नाही. माझ्या सहचारिणी वैशालीने मला खूप साथ दिली.