
सिंधुदुर्गनगरी : कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशन कॉन्फरन्स ही ४७ वी कॉन्फरन्स जे.एन.एम.सी. आणि के.एल.इ. हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आली होती. सदर ऑर्थोपेडिक कॉन्फरन्समध्ये संपूर्ण देशातून तब्बल ११०० तज्ञ ऑर्थोपेडिक सर्जन उपस्थित होते. कर्नाटक ऑर्थोपेडिक एसोसिएशनच्या या ४७ व्या कॉन्फरन्समध्ये देशाच्या ऑर्थोपेडिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्व सिव्हिल सर्जन आणि विद्यमान एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉ. आर. एस. कुलकर्णी यांना गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी प्लेटलेट इंजेक्शन ॲट नॉन-युनिअन लाईट ऑफ लॉन्ग बोन्स फ्रॅक्चर या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच अश्या ट्रीटमेंट देताना येणारे अनुभव सांगितले. डॉ. आर. एस. कुलकर्णी यांचे हे संशोधपर लेक्चर उपस्थित सर्व तज्ञ ऑर्थोपेडिक सर्जन यांना वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ योगदानासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. डॉ. कुलकर्णी यांनी सिव्हिल हॉस्पिटल ओरोस आणि एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल येथी प्लेटलेट इंजेक्शन ॲट नॉन-युनिअन लाईट ऑफ लॉन्ग बोन्स फ्रॅक्चर या विषयावर १२८ रुग्णांवर यशस्वी उपचार करून ऑर्थोपेडिक क्षेत्रात संशोधनपर कार्य आणि सदर विषयावर जर्नल पब्लिश केले आहे.
ऑर्थोपेडिक क्षेत्रातील नवीनतम उपचार यंत्रणा म्हणून सदर उपचार पद्धती डॉ. कुलकर्णी यांनी भारत देशातील तज्ञ डॉक्टर यांच्या समोर मांडली. या उपचार पद्धतीमध्ये शरीरातील लांब हाडे फ्रॅक्चर झाल्यावर त्यावर तब्बल दोन वेळा सर्जरी करून देखील हाड जोडले जात नाही, यावर डॉ. आर एस कुलकर्णी यांनी सांगितलेली मेथड रामबाण इलाज ठरली आहे. या पद्धतीने रुग्णाच्या फ्रॅक्चर वर योग्य इलाज केला जाऊ शकतो हे डॉ. आर एस कुलकर्णी यांनी सिद्ध करून दाखविले.
डॉ. आर एस कुलकर्णी यांना सदर मार्गदर्शनपर लेक्चर साठी कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष यांच्या हस्ते मोमेंटो आणि फॅकल्टी सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.