डॉ. प्रदीप हळदवणेकर राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार २०२३ ने सन्मानित...!

Edited by:
Published on: June 28, 2023 11:22 AM
views 89  views

सिंधुदुर्ग :  "एकमेका देऊ आधार,आपणच आपला करू उद्धार" या उद्देशाने कार्य करत असलेल्या हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांचे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा *राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार २०२३* यावर्षी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता *डॉ.प्रदीप हळदवणेकर* यांना देऊन सन्मानित करण्यात आले. 


संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री. सुनील फडतरे हे अंध असून देखील समाजातील अंध,अपंग व गरजू लोकांसाठी समाजसेवेचे काम करत आहे. अश्या संस्थेकडून सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाचे कौतुक व्हावे आणि त्यांच्या हातून समाजासाठी भविष्यात देखील सकारात्मक काम व्हावे या उद्देशाने सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 


डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मध्ये ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल तसेच सन २०१६ ते २०१८ या कालावधीत डॉ.प्रदीप हळदवणेकर यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सहयोगी संशोधन संचालक म्हणून तसेच २०१८ ते आजतागायत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे सहयोगी अधिष्ठाता या पदावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रवळनाथ मंदिर ओरोस येथे झालेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार देऊन डॉ.प्रदीप हळदवणेकर यांना सन्मानित करण्यात आले. याबद्दल सर्व स्तरातून डॉ. हळदवणेकर सर यांचे कौतुक होत आहे.