सावंतवाडीत डॉ.फोन !

उद्या शोअरूमचं ग्रॅण्ड ओपनिंग
Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2025 16:51 PM
views 738  views

सावंतवाडी : अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एस ॲण्ड टी प्रा.लि. ''डॉ.‌फोन'' आपलं दुसरं फ्रँचायझी शोरूम थेट सावंतवाडीत घेऊन येत आहे. भव्य आणि सुसज्ज मोबाईल, स्मार्ट इलेक्ट्रॉनिक शोरूम व सर्व्हिस सेंटर उद्या ३० एप्रिल २०२५ रोजी स. ११ वा. दतात्रय निवास, गांधीचौक, तारा हॉटेल समोर सुरू होत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. फोन दर्जेदार सेवा देण्यासाठी उपलब्ध झालं आहे. विविध प्रकारचे मोबाईल, स्मार्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे उपलब्ध होणार आहेत. उद्या या शोअरूमचा शुभारंभ होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. फोन सावंतवाडी सर्व्हिसेस अँड टेक हव प्रायव्हेट लिमिटेड, मॅनेजिंग डायरेक्टर मिहीर सीमा मिलिंद जयानंद मठकर व मठकर कुटुंबीय तसेच पंकज कृष्णा सावंत, फाउंडर - सर्व्हिसेस अँड टेक हव प्रायव्हेट लिमिटेड, स्नेहा पंकज सावंत, सीईओ सर्व्हिसेस अँड टेक हव प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात आले आहे.