
सावंतवाडी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विक्रा़ंत सावंत यांना धक्का देत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या डॉ. अर्चना सावंत यांनी विजयश्री खेचून आणला. पहिल्या फेरीपासून लीड घेत त्यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार संजना सावंत यांना पराभवाची धूळ चारली.
प्रतिष्ठेची ठरलेल्या माजगाव ग्रामपंचायतील ठाकरे शिवसेनेला आस्मान दाखवत भाजपऩ आपलं कमळ फुलवल आहे.भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीनं या ठिकाणी बाजी मारली आहे. युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना अजय सावंत या ३६८ मताधिक्क्याने विजयी झाल्यात. युतीचे एकूण ९ सदस्य तर ठाकरे सेनेचे ४ सदस्य विजयी झाले. या ठिकाणी ठाकरे सेना मागील वेळेप्रमाणे विजयी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र युतीने त्यांना पाणी पाजत घवघवीत विजय संपादीत केला.
या विजयासाठी युतिचे अशोक दळवी, संजू परब, मनोज नाईक, रेश्मा सावंत, बाबू सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले होते. तर भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत यांनी पत्नीच्या विजयासाठी घेतलेल्या मेहनतीच फळ माजगाव वासियांनी त्यांच्या पदरात टाकलं आहे. डॉ. अर्चना सावंत यांच्या या विजयाने विक्रांत सावंत यांना पराभवाचा मोठा धक्का मानला जात आहे.