डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण ; अंदुरे - कळसकरला जन्मठेप !

तावडे, पुनाळेकर, भावे निर्दोष !
Edited by: ब्युरो
Published on: May 10, 2024 06:08 AM
views 287  views

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण खटल्याचा तब्बल ११ वर्षांनी शुक्रवारी (दि.१०) निकाल लागला. दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हत्येचा तपास पूर्ण होऊन सप्टेंबर २०२१ मध्ये पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे. शुक्रवारी या खटल्याचा निकाल लागला.