
सावंतवाडी : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना मौनी पंतप्रधान म्हणून हिणवण्यात आले. परंतु ते मौनी नव्हे, तर तर कर्तृत्ववान पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढत प्रगतीपथावर नेले. त्यांच्या धोरणामुळे आज आपल्याला विकासाची फळे चाखता येत आहेत. त्यांचे कार्य देशातील लोकांच्या कायम स्मरणात राहील अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. माजी पंतप्रधान कै.डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रेरणादायक नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कृतज्ञता सभेचे आयोजन येथील श्रीराम वाचन मंदिरात करण्यात आले होते. यावेळी आम्ही भारतीय चे अॅड. संदीप निबाळकर, अँड. नकुल पार्सेकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, महिला अध्यक्षा साक्षी वंजारी, डॉ. विनया बाड, अफरोज राजगुरू, आनंद परुळेकर, संदीप सुकी, संजय लाड, माया चिटणीस, वंचित बहुजनचे महेश परुळेकर, अभय मालवणकर आदी उपस्थित होते.