जयंवती बाबू फाउंडेशन संचलित MITM कॉलेज प्राचार्यपदी डॉ. एस. व्ही. ढणाल

Edited by:
Published on: January 05, 2024 19:10 PM
views 134  views

सिंधुदुर्गनगरी : मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड या अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या  प्राचार्य पदी डॉ. एस.व्ही.ढणाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.

डॉ. एस. व्ही.ढणाल यांनी शिवाजी विद्यापीठातून मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये बी.ई.तसेच एम.टेक.पदवी मिळवली असून विश्वेश्वराय टेकनॉलॉजी युनिव्हर्सिटी बेळगाव  येथून पीएचडी संपादन केली आहे.

डॉ. ढणाल यांनी याआधी वारणानगर इंजिनिरिंग कॉलेज, केआयटी कोल्हापूर येथे प्राध्यापक तसेच संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक,  विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे.  त्यांना अध्यापन, संशोधन,  इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट समन्वय  कामाचा दीर्घ अनुभव आहे.

जयवंती बाबू फौंडेशनचे  अध्यक्ष श्री संतोष पाल, उपाध्यक्ष श्री विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, विश्वस्त केतन कदम,प्रोफेसर. सूर्यकांत नवले यांनी डॉ. एस. व्ही.ढणाल याचे स्वागत तसेच शुभेच्या दिल्या आहेत.