दोडामार्ग तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव होणार थाटात साजरा

'जयंती महोत्सव समिती' चे गठण | अध्यक्ष पदी शंकर झिलू जाधव यांची निवड
Edited by: संदीप देसाई
Published on: March 21, 2023 10:32 AM
views 133  views

दोडामार्ग : यावर्षी दोडामार्ग तालुक्यातील ५ संघटनांच्या संयुक्त विद्यामाने भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव थाटात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात रविवारी दोडामार्ग येथील स्नेह अपार्टमेंट मध्ये शंकर झिलू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजना संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी यावेळेला जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन झालं.


दोडामार्ग तालुकास्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव तालुक्यातील आरपीआय आठवले गट, सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि युवा परिवर्तन संघर्ष संस्था दोडामार्ग या सर्व संघटनाच्या तालुका शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. नियोजन संदर्भात आयोजित बैठकीत चर्चा करून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय समाजातील नवनीर्वांचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, बौद्ध श्रामणेर, समता सैनिक दल यांचा सत्कार तसेच या समाजामध्ये दहावी, बारावी, पदवीधर तसेच पदवीत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थी यांचा गुणगौरव आणि समाजातील बचत गटांमधील महिलांचा सन्मान केला जाणार आहे. 

 तालुक्यातील विविध संघटना एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याने या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तालुक्यातील लोक या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने या लोकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याचे नियोजन केले आहे. 


यावेळी या नियोजन बैठकीस आरपीआय (आठवले ) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, माजी जिल्हा समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, आरपीआय (आठवले ) जिल्हा सचिव प्रकाश कांबळे, बौध्द हितवर्धक महासंघ तालुका शाखा दोडामार्ग अध्यक्ष शंकर झिलू जाधव, सचिव शंकर मधुकर जाधव, खजिनदार अर्जुन आयनोडकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग अध्यक्ष अर्जुन कदम, संस्कार उपाध्यक्ष बुद्धाभूषण हेवाळकर, वंचित बहुजन आघाडी दोडामार्ग तालुका अध्यक्ष नवसो कदम, उपाध्यक्ष संतोष जाधब, सचिव घुसाजी जाधव, खजिनदार श्रीधर जाधव, युवा परिवर्तन संघर्ष संस्था दोडामार्ग सहसचिव संदीप जाधव, त्याचप्रमाणे मनोहर जाधव, प्रेमानंद कदम, रामदास कांबळे, विनोद कदम, साटेली भेडशी ग्रामपंचायात सदस्य प्रकाश कदम, नवसो वसंत पावसकर सह आदी उपस्थित होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्ग अध्यक्ष पदी शंकर झिलू जाधव, सचिव प्रकाश कांबळे, खजिनदार अर्जुन आयनोडकर सदस्य म्हणून रामदास कांबळे, नवसो पावसकर, प्रेमानंद कदम, संदीप जाधव, प्रकाश कदम, नवसो कदम, संतोष जाधव, घुसाजी जाधव, अर्जुन कदम, मधुकर कदम, श्रीधर जाधव, संदीप जाधव, विजय कांबळे, रामा कांबळे.