डॉ. शिरोडकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन! मिठबाव येथे विविध कार्यक्रम

आकाशवाणीचे माजी केंद्र संचालक गोविंद गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 19, 2022 17:55 PM
views 210  views

देवगड :  क्षा. म. स. शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. डॉ. रा. का. शिरोडकर यांची पुण्यतिथी दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी  तालुक्यातील मिठबाव येथे साजरा करण्यात आली. यावेळी आकाशवाणीचे माजी केंद्र संचालक गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत पुरळकर (मिठबाव), सहाय्यक कार्यकारी अधिकारी (प्रशासन) एम. के. लोके, सहाय्यक कार्यकारी अधिकारी (वित्त) तथा प्राचार्य, डी. एड. कॉलेज, मिठबाव प्रा. बी. के. चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे आबा लोके, मिठबाव गावचे उपसरपंच फाटक, मुख्याध्यापक आर.आर.राऊत, कै. अंकुश गावडे शिक्षण संस्थेचे चेअरमन ग. ना. लोके, माजी विद्यार्थी संजय जाधव, विकास परब, तंटामुक्ती अध्यक्ष पंडित पारकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षया लोके, पूनम मयेकर, सत्कारमूर्ती श्रीम. चव्हाण, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापक अंकिता डगरे, पर्यवेक्षक राजेंद्र हिंदळेकर,  सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भित्तीपत्रके, हस्तलिखिते यांचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेच्या वतीने  अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माजी विद्यार्थी, आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी १९८२ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी एलईडी प्रोजेक्टर व शैक्षणिक साहित्य हायस्कूलच्या विद्यार्थ्यांयांसाठी भेट म्हणून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालचंद्र चव्हाण यांनी केले.,सूत्रसंचालन राजेंद्र हिंदळेकर यांनी तर आभार आर.आर.राऊत यांनी मानले.