डॉ. दिक्षित फॅन्स ग्रुपचा स्नेह मेळावा व बक्षीस वितरण उत्साहात

विनासायास वजन कमी करणे व मधुमेह प्रतिबंध विनामूल्य सल्ला केंद्राचे करण्यात आले उद्घाटन
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 22, 2022 17:49 PM
views 226  views

मुंबई : डॉ. दिक्षित फॅन्स ग्रुप यांचा स्नेह संमेलन मेळावा व बक्षीस वितरण समारंभ कामोठे नवी मुंबई येथे भव्य दिव्य स्वरुपात संपन्न झाला. समारंभासाठी स्वतः दिक्षित जीवनशैलीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दिक्षित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याबरोबर प्रकाश चव्हाण व संजय पाटील उपस्थित होते.

डॉ. दिक्षित सरांच्या अभियानातून प्रेरित होऊन असा एक ग्रुप असावा, ज्यामधे सर्व डॉ. दीक्षित जीवनशैलीचे फॉलोअर्स नेहमी प्रभावित राहून अभियानाचा प्रसार-प्रचार करता येईल या संकल्पनेतून श्रीमती नम्रता पाटील व सौ. अर्चना  कंड्रे यांनी 2020 मध्ये डॉ दिक्षित फॅन्स ग्रुप स्थापन केला. डॉ दिक्षित यांच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकापर्यंत घेऊन जाणे व त्यातून लोकांचे आयुष्य सदृढ आणि निरोगी कसे राहील, हे या अभियानाचे आणि ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट ठेवून वाटचाल करू लागला. त्यात नवनवीन उत्साही मेंबर जॉईन होत गेले. मग एकमेकांना प्रेरणा देणे, शंकाचे निरसन, वेळ प्रसंगी दीक्षित सरांचा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा सल्ला घेणे, अशी कार्यपद्धती आहे. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. अश्या स्पर्धाचे बक्षीस वितरण नुकतेच झाले. 


कार्यक्रमाची सुरुवात ग्रुपच्या संस्थापिका नम्रता पाटील यांनी स्वागत करून केली,  त्यानंतर डॉ जगन्नाथ दिक्षित यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. डॉ. श्रीकांत जिचकार व ग्रुपमेंबर रोहन भोसले यांना आदरांजली वाहून व्याख्यानाला सुरुवात केली. दिक्षित सरांनी सर्व दिक्षित फॅन्स सदस्य यांचे  कौतुक करून, दीक्षित जीवनशैलीबद्दल थोडक्यात सांगितले. त्यात डॉ. दीक्षित फॅन्स ग्रुप कसा आणी अगदी विदेशात पसरलेला आहे हे सांगितले. त्यानंतर सरांनी आलेल्या प्रश्नाचे व शंकांचे निवारण केले. या वेळी सरांचे व्याख्यान हे  मुख्यत्वे करून डॉ दीक्षित जीवन शैली अंगीकारली आहे त्यांनी अजून प्रगती कशी करता येऊ शकते यावर जोर दिला. 

डॉ दीक्षित सरांच्या हस्ते विविध स्पर्धा मधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. 


व्याख्यानानंतर डॉ दीक्षित सरांच्या हस्ते विनासायास वजन कमी करणे व मधुमेह प्रतिबंध विनामूल्य सल्ला केंद्राचे ही ह्याठिकाणी औपचारिक उदघाटन झाले. 

ह्या सल्ला केंद्राचे मुख्य समन्वयक म्हणून श्रीमती नम्रता पाटील, सौ त्रिवेणी जानसकर व सौ वैशाली वाफारे ह्या काम बघतील. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन श्री गोविंद विभुते आनी सौ शर्मिला चव्हाण  यांनी उत्कृष्टपणे सांभाळले 

 

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉ जगन्नाथ दिक्षित फॅन्स ग्रुपचे नरेंद्र बडगुजर व सुनील पवार आणि इतर सर्व सदस्यांनी खूप मोठे योगदान दिले.