डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची देव्या सुर्याजी यांनी घेतली भेट..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 10, 2023 15:32 PM
views 145  views

सावंतवाडी : युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी त्यांच्याकडे केली. रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व रूग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी देव्या सुर्याजी यांनी केली आहे. यावर डॉ. ऐवळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. गिरीश चौगुले, डॉ. आकाश हेडगे, मिहीर मठकर आदी उपस्थित होते.