देवगडात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच भव्य दिव्य आयोजन

अॅड. वैशाली डोळस यांचे शिवराय ते भिमराय यं विषयावर होणार व्याख्यान
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 12, 2023 18:24 PM
views 785  views

देवगड : शैक्षणिक, सामाजिक,सांस्‍कृतिक, कला, क्रिडा आणि राजकीय चळवळीचे श्रोत असलेल्‍या देवगड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देवगड शहराच्‍या मध्‍यवर्ती व्‍हावी, असा मतप्रवाह गेली अनेक वर्ष देवगड तालुक्यातून व्‍यक्‍त होत होता. याच विचारांचा धागा पकडून देवगड शहर विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समिती गठीत करून 14 एप्रिल 2023 रोजी देवगड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

देवगड-जामसंडे या शहराला अनेक बुध्‍दीजीवी लोकांचा शैक्षणिक, राजकिय, सामाजिक, सांस्‍कृतिक, कला-क्रिडा विषयक चळवळींचा वारसा आहे. या शहरात विविध मंडळाचे लोकाभिमूख कार्यक्रम सातत्‍यांने होत असतात. याच पध्‍दतीने सर्वमावेशक असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती कार्यक्रम देवगड शहराच्‍या मध्‍यवर्ती व्‍हावा, अशी देवगडमधील वकील, इंजिनियर्स, प्राध्‍यापक, डॉक्टर, शिक्षक, व्‍यापारी, राजकीय पक्षांचे नेते, समाजिक कार्यकर्ते यांची भावना होती. या भावनांचा आदर करत देवगड शहर समिती विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समिती गठीत करण्‍यात आली आहे.

          महामानव आंबेडकर यांच्‍या सामाजिक आणि लोकशाही विचारांचा आधार घेत लोकांनी लोकांच्‍या सांविधानिक विचारांना बळकटी देण्‍यासाठी आयोजित केलेली जयंती हा उध्‍देश ठेवून आणि देवगड तालुका  वासियांच्‍या भावनांना चालना देण्‍यासाठी देवगड शहरात जयंती बाबासाहेबांची, सांविधानिक विचारांची या विचार धारेने डॉ. आंबेडकर जयंती उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या जयंती कार्यक्रमासाठी देवगड जामसंडे देवगड तालुक्‍यातील व्‍यापारी, उदयोजक, व्‍यावासायिक आणि सामाजिक कार्यकर्त्‍यांचा वैचारिक प्रोत्‍सानाबरोबरीनेच आर्थिक हातभार देखील मिळत असून या उपक्रमशिल जयंतीचे सर्व स्‍तरातून कौतूक होत आहे.

        या कार्यक्रमानिमित्‍त विश्‍वव्‍यापी छ.शिवाजी महाराज आणि डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक प्रवास देवगड तालुक्‍यातील युवा पिढीला समजण्‍यासाठी सुप्रसिध्‍द व्‍याख्‍याती अॅड.वैशाली डोळस यांचे शिवराय ते भिमराय या विषयावर व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले आहे. दि.14 एप्रिल रोजी सायंकाळी 5.00 वाजता देवगड कॉलेज नाका ते देवगड तहसिलदार परिसरातील प्रांगणापर्यंत डॉ. आंबेडकर यांच्‍या विरांना जागृत करण्‍यासाठी अभिवादन रॅली निघाणार आहे. यानंतर अभिवादन सभेला अॅड.श्रीम.डोळस शिवराय ते भिमराय या विषयावर संबोधित करणार आहेत. सभेच्‍या सांगता कार्याक्रमाअंती आरंभ नव्‍या युगाचा  संगितमय भिमगितांचा नजराणा हा सांस्‍कृतिक कार्यक्रम संपन्‍न होणार आहे.अभिवादन सभेकरता आमदार नितेश राणे, नगराध्‍यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्‍यक्षा मिताली सावंत, तहसिलदार तथा परिविक्षाधिन उपजिल्‍हाधिकारी स्‍वाती देसाई, गटविकास अधिकारी अरूण चव्‍हाण यांची प्रमूख उपस्थिती असणार आहे.  तरी देवगड तालुका वासियांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येन उपस्थित राहून सामाजिक विचारांना बळकट करण्‍याचे आवाहन देवगड शहर समिती विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम समिती कार्यवाह दिलीप कदम, अध्‍यक्ष कृष्‍णकांत कदम यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे केले आहे.