
सावंतवाडी : वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आज औषधी वनस्पती सर्व आरोग्यावर रामबाण उपाय ठरत आहे. आयुर्वेदिक महाविद्यालय ही खऱ्या अर्थाने आरोग्य खात्याचे देवदूत ठरत आहेत. सावंतवाडी येथील जानकीबाई सुतिकागृह संस्थेच भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय हे संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्तम दर्जाचे महाविद्यालय म्हणून गणले जात आहे. हे आयुर्वेदिक महाविद्यालय स्वतःचे औषधी वनस्पती रिसर्च सेंटर निर्माण केले असून हे उत्तम काम आहे. असे मिरज येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. भास्कर के प्राणी व डॉ सारिका प्राणी यांनी स्पष्ट केले. या प्रसिद्ध डॉक्टर दांपत्याने आज सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेट दिली. येथील आयुर्वेदिक सेंटर तसेच या महाविद्यालयाचे विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या कारभाराचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड दिलीप नार्वेकर, संचालक उमाकांत वारंग यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्राचार्य डॉ. संजय दळवी, डॉ. विकास कठाणे, सौ. गायत्री देशपांडे आधी उपस्थित होते. यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ. प्राणी म्हणाले, औषधी वनस्पतीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. शेवगा व त्याची पाने हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत गुणकारी आहेत. सर्व रोगांवर शेवगा व त्याची पाने उपयोगात आणली जात आहेत. कोरोना महामारीनंतर खऱ्या अर्थाने औषधी वनस्पतीला चांगले दिवस आलेत. आयुर्वेद हे उत्तम गुणकारी उपाय पद्धती आहे. आम्ही आमच्या पाच पिढ्या या डॉक्टर व्यवसायात आहेत. आम्ही एकंदरीत अभ्यासानुसार असा तर्क काढला आहे. की औषधी वनस्पती त्यातील गुणधर्म हे आपल्या आरोग्यासाठी देवदूत आहेत. मात्र त्या वनस्पतींचे प्लांट उभे राहणे गरजेचे आहे. आपल्या भागातील वनस्पती औषधी गुणधर्मासाठी परदेशात रिसर्च सुरू आहे. आपल्या भागातही आज गावागावात लोकांनी औषधी गुणधर्म असलेल्या प्लांट उभे करणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले. यावेळी पॅथॉलॉजी डॉ .सारिका प्राणी यांनी विविध विषयावर आपले मार्गदर्शन केले. मिरज येथे आम्ही मल्टी स्पेशालिस्ट दर्जाचे हॉस्पिटल उभे केले आहे. या भागातील लोकांना निश्चितपणे सर्व प्रकारचे सुविधा दिली जाणार आहे. मोफत सुविधाही आपण देत आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी डॉक्टर प्राणी दांपत्य हे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांनी आमच्या महाविद्यालयाला भेट देऊन अभ्यास दौरा केला. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. असे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य संजय दळवी यांनी सविस्तर माहिती दिली.