
सावंतवाडी : बाल उत्कर्ष मंडळ, चराठे पंचशीलनगर यांच्या विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ रोजी साजरी करण्यात आली .
सकाळी १०.०० वा प्रतिमा पूजन आणि वंदना झाली. सकाळी ११.०० वा अभिवादन सभा झाली, प्रमुख पाहुण्यांची बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर भाषणे झाली दुपारच्या सत्रात महिलांसाठी आणि मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७.०० वा भीमगीत व समुहगान कार्यक्रम झाला.
जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून सायंकळी ८.०० वाजता वेट लिफ्टींग स्पर्धेत ज्युनियर गटात राष्ट्रीय स्पर्धेत, तसेच विविध स्पर्धेमध्ये विजयी खेळाडू कु.हेमांगी गजानन मेस्री आणि विधी पदवी (B.A.LLB.) वकीली पदवी संपादन केलेल्या श्री. सगुण जाधव माळेवाड यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर वाडीतील कर्तबगार महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येंन उपस्थित होते.
रात्री ९.०० वा रेकॅार्ड डान्स स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये कु. सोहम जांभोरे प्रथम, कु. निधी खडपकर द्वितीय, तृतीय कु. मानसी परब , कु. सलोनी चराठकर आणि कु. दिशा परब उत्तेजनार्थ हे विजयी स्पर्धक ठरले. या प्रसंगी चराठे गावच्या सरपंच सौ. प्रचिती कुबल, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. नारायण परब, पोलिस पाटील श्री. सचिन परब, चराठे देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. लक्ष्मण परब, अॅड- मंगेश धुरी, ग्रा प. सदस्य- श्री. अविनाश जाधव, श्री.राजन परब, माजी पंचायत समिती सदस्य श्री. विश्राम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते - श्री.चंद्रकांत वेजरे, श्री. दर्शन धुरी इ.मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन- श्री शरद जाधव यांनी केले शेवटी अध्यक्ष मनोहर जाधव यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले.