'भिमशक्ती'च्यावतीने महामानवास अभिवादन !

Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 19:34 PM
views 105  views

सावंतवाडी : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष किसन पवार, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चालवादी, दिनेश चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी किशोर जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व बहुजन, वंचित, पिडित स्त्री, पुरुष, धर्म, जातीसाठी महान कार्य केले असून याचे भान सर्वांनी ठेवण्याचे आवाहन केले. 

       

यावेळी राजन निगुडकर, दीपक जाधव, पांडुरंग जाधव, मोरेश्वर जाधव, गणेश उर्फ राज जाधव, धोंडी जाधव, शशीकांत नेमळेकर, भावेश नेमळेकर, भैय्या नेमळेकर, न्हानु जाधव, राजन कासले अशोक कांबळे, शांताराम कासले, अनिल कासले, अजित न्हावेलकर, बिरबल चौगुले,  करण चलवादी, भगवान तारी, कांचन जाधव, संगिता जाधव, अंकुश परब, योगेश परब, मंगेश न्हावेलकर, प्रकाश जाधव, विष्णू जाधव केशव जाधव, शांताराम कासकर, नितीन राठये, विक्रम कदम, रामचंद्र कदम, रसिका कदम, किरण कदम, भगवान कदम, अनिरुद्ध पवार, बबन कांबळे, देविदास कदम आदी उपस्थित होते.