
वेंगुर्ला : आज १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेना शाखेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर , तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, सत्यवान साटेलकर, उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर, मनोज पांगम, चंदु जाधव, श्रीनाथ तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.