
चिपळूण : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या २०२४-२०२५ रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत संचालक मंडळाने पुढील वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. याच उपक्रमांचाच भाग म्हणून, प्राथमिक, माध्यमिक आणि खुल्या गटात , निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारांशी, कार्याशी आणि इतर सामाजिक विषयांवर आधारित होती. या स्पर्धेत तालुक्यातून वक्तृत्व स्पर्धेसाठी ५५ आणि निबंध स्पर्धेसाठी ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या निबंंध स्पर्धेेचे परीक्षण प्रा.विनायक होमकळस, प्रा.सोनाली खर्चे, प्रा.प्रदीप मोहिते यांनी तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विनोद फणसे, संभाजी कुरुंद, विशाखा चितळे, शिवाजी शिंदे, सुनीता महाडिक, मनेष मोहिते यांनी केले.
निबंध लेखन विजेते -
---------------------------
खुला गटात प्रथम क्रमांक- निकिता नितीन कुळे
( आर.सी.काळे.विद्यालय, पेढे) ,
द्वितीय क्रमांक- उज्वला उमेश गुरव ( प्राथमिक शिक्षिका , जि.प.शाळा खेर्डी नं.१)
तृतीय क्रमांक- अश्विनी विश्वनाथ कदम ( उच्च माध्यमिक विद्यालय भोम ).
माध्यमिक गटात आर.सी.काळे विद्यालय, पेढे च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत अनुक्रमे, प्रथम- मनस्वी मिलिंद घोरपडे, द्वितीय- आर्या उमेश घोरपडे आणि तृतीय- गार्गी राजेंद्र घाग यांनी प्राप्त केले.
प्राथमिक गटात- प्रथम क्रमांक- नंदेश कुंदन शितप (आर.सी.काळे विद्यालय, पेढे), द्वितीय- नेहा प्रसाद सोमण ( युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण) , तृतीय क्रमांक- भार्गवी विनोद भडवळकर ( प्राथमिक शाळा मिरवणे ) यांना देण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेतील यशाचे मानकरी
---------------------------------------
खुला गट- प्रथम क्रमांक- अथर्वी अमित चव्हाण ( न्यू इंग्लिश स्कूल, सती खेर्डी-चिंचघरी) , द्वितीय क्रमांक- ओंकार संदिप वेलोडे ( गुरुकुल कॉलेज चिपळूण),
तृतीय क्रमांक- तनुष्का जयगणेश नाटेकर.
माध्यमिक गट- प्रथम क्रमांक- मुक्ता संजय बापट ( आर.सी.काळे विद्यालय, पेढे) , द्वितीय क्रमांक- आर्या अंतरकर ( इंग्लिश मीडियम स्कूल, मार्गताम्हाणे), तर तृतीय क्रमांक विभागून- भार्गवी शंकर कानडे ( आर.सी.काळे विद्यालय, पेढे आणि सई कदम ( इंग्लिश मीडियम स्कूल मार्गताम्हाणे) यांना देण्यात आला.
प्राथमिक गटात- प्रथम क्रमांक- सीया चंद्रसेन मोहिते ( धोंडीराम दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, सती खेर्डी- चिंचघरी), द्वितीय क्रमांक- गायत्री मिलिंद तांबे ( केंद्र शाळा मिरवणे) , तृतीय क्रमांक- वेदिका निलेश महाडिक ( आर.सी.काळे.विद्यालय, पेढे) यांना देण्यात आले.
सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम , प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन गौरविण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख म्हणून युनायटेड इंग्लिश स्कूल चे माजी मुख्याध्यापक श्री. केतकर, सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्यवाह सुमेध करमरकर, प्राची जोशी, शरद तांबे, प्रदीप पवार, अमित ओक, गणेश सोनवणे, चंद्रकांत सावर्डेकर, मार्गदर्शन विनायक ओक, ग्रंथपाल तेजस्वी सोमण आणि कर्मचारी उपस्थित होते.