शिवसेनेच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी

Edited by:
Published on: April 14, 2025 18:14 PM
views 75  views

सावंतवाडी : शिवसेनेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती आणि माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते देशाच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

सावंतवाडी येथील माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात झालेल्या या आंबेडकर जयंती उत्सवामध्ये सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी शिवसेना शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर महिला पदाधिकारी लतिका सिंग ज्योत्स्ना सुतार राजन रेडकर संदेश गुरव लक्ष्मण भालेकर विश्वास घाग गजानन नाटेकर योगेश नाईक प्रसाद नाईक गुंडू जाधव सदा कदम संजय पालेकर अरुण जाधव माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर पांडुरंग नाईक निवृत्त कॅप्टन सुभाष गावडे एकनाथ हळदणकर नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा गुड्डू जाधव दिल्या व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.