DPDC साठी नारायण राणेंची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 10, 2023 17:07 PM
views 323  views

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात सुरु आहे. या सभेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार  नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, यासह अधिकारी उपस्थित आहेत. मात्र, एरव्ही नियोजन सभा गाजवणारे आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे  केंद्रीयमंत्री नारायण राणे आजच्या सभेला अनुपस्थित असल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.