
सावंतवाडी : गेळे वासियांच्या प्रश्नाकडे मी राजकीयदृष्ट्या बघत नाही. लोकांचं काम व्हावं, त्यांच्या जमिनी त्यांना मिळाव्यात ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. शासन या दृष्टीने सहकार्य करेल असं मत माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी व्यक्त केले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर केलेल्या विधानासंदर्भात विचारलं असता ते बोलत होते.