शालेय शिक्षणमंत्र्यांवर दोडामार्ग शिवसेना शहरप्रमुखांचा अविश्वास नाही का ?

दोडामार्ग पाणी प्रश्नी उपनगराध्यक्ष देविदास गवस यांचा सवाल ?
Edited by: संदीप देसाई
Published on: October 07, 2023 19:37 PM
views 147  views

दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतमध्ये पाण्यासंदर्भात झालेलं आंदोलन व  दोडामार्ग शहरात  दुषित व गढुळ पाणीपुरवठा होत असल्याचे आरोप व टिका बिनबुडाची आहे, असा पलटवार नगरपंचायत चे उपनराध्यक्ष देविदास गवस यांनी लगावला आहे. इतकचं नव्हे तर दोडामार्ग शहरासाठी वॉटर फिल्ट्रेशन प्लांटची नगराध्यक्षांनी शिवसेना नेते आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. दोडामार्ग गणेश दर्शन वेळी वॉटर फिल्ट्रेशन प्लांटसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिवसेना कार्यकर्ते व शहरप्रमुख  त्यांच्यासमोरच दीले होते. असे असतानाही कर आंदोलने होत असतील तर त्यांच्या नेत्यांवर शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांचा विश्वास नाही का? असा सवाल गवस यांनी उपस्थित केलाय.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, हल्लीच एका पक्षातून दुस-या पक्षात प्रवेश करुन शहर प्रमुख झाल्यानंतर काहीतरी संघटनेसाठी व संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे भासवण्यासाठी इतर पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन कोणती संघटना वाढवित आहेत. याचा साधे ज्ञान नसलेल्या शहर प्रमुखाने आपल्या नगरपंचायतीवर टिका करु नये व आपल्या पक्षाच्या आमदार मंत्रीमहोदयांबद्दल अविश्वास दाखवू नये, असा सल्लाही नाव न घेता शिवसेना शहरप्रमुख योगेश महाले यांना गवस यांनी दिला आहे.

 महाले त्यांच्या सोबत काल आंदोलनास उपस्थित असणारे शहरातील इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायत काळात सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्षही पदे भुषविली होती. त्यावेळी देखील गढूळ पाण्याचा प्रश्न होताच. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्याचा ग्रामपंचायत व नगरपंचायतीस काय उपयोग करुन दिला. गढूळ पाण्यावर काय उपाययोजना केली व कोणती विकासकामे केली याचे आत्मचिंतन करावे अशी टीका नाव न घेता केली आहे. उलट या दिड वर्षाच्या कालावधीत कसई दोडामार्ग नगरपंचायतीने केलेल्या विकासकामाचा व कार्याचा निःस्वार्थी निःपक्षपातीपणे विचार करावा.

कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये होत असलेल्या विकासकामांचा व राज्यस्तरीय पुरस्कारांचा, स्वच्छतेबाबत व इतर सर्व कामांबाबत दोडामार्गची सर्व जनता समाधानी आहे. तर राहीलेला वॉटर फिल्ट्रेशन प्लांटचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावून दोडामार्गच्या जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी अवधी लागणार आहे. तरी नगरपंचायतीतील सर्व जनतेने आम्हांस सहकार्य करावे असे स्पष्ट केलं आहे.