
सिंधुदुर्ग : डॉन बोस्को हायस्कूल व जुनिअर कॉलेज, ओरोस प्रशालेचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा वाणिज्य व शास्त्र या दोनीही शाखेचा निकाल सालाबादप्रमाणे १०० टक्के लागला. गेली ११ वर्षे सतत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. शास्त्र / SCIENCE शाखा एकूण विद्यार्थी २७ प्रविष्ठ झाले होते १) गुणानुक्रमे प्रथम क्रमांक -कुमारी भाविका मकरंद सावंत एकूण गुण ८७.८३ टक्के २) गुणानुक्रमे द्वितीय क्रमांक – देवम रविंद्र मयेकर एकूण गुण ७९.३३ टक्के ३) गुणानुक्रमे तृतीय क्रमांक – तन्मय राजेंद्र वाघ एकूण ७८.१७ टक्के .
वाणिज्य / COMMERCE शाखा एकूण विद्यार्थी २३ प्रविष्ठ झाले होते १) गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कुमारी चैत्राली राजेश वळंजू एकूण गुण ९५.०० टक्के २) गुणानुक्रमे द्वितीय क्रमांक कुमार सोहम सिद्धार्थ जामसंडेकर एकूण गुण ९३.५० टक्के ३) गुणानुक्रमे तृतीय क्रमांक - कुमार कार्तिक रघुनाथ मसुरकर एकूण गुण ८९.८३ टक्के.
प्रशालेचे मुख्याध्यापक फादर सवियो गोम्स उप् मुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव संस्थेचे मॅनेजर फादर पॉल डिसोझा तसेच व्यवस्थापक फादर फ्रान्सीस झेवियर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.