
सावंतवाडी : तालुक्यातील डोमिनिक फर्नांडिस हा युवक क्रॉनिक किडनी डिसीजशी झुंज देत आहे. दोन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी निधी उभारण्यास मदत करावी,या दुर्धर आजारातून बाहेर पडण्यासाठी आपली मदत मोलाची ठरेल असं आवाहन त्याच्या मित्रपरिवार व कुटुंबियांकडून करण्यात आलं आहे.
सावंतवाडी तालुक्यातील डॉमनिक फर्नाडिस गेल्या दोन महिन्यांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या उपचारांवर आधीच 4 लाख रुपये खर्च झाले आहेत. हा खर्च 15 लाख रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य कुटुंबातील डॉमनिक फर्नाडिस असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यात कुटुंबाचे आधार डॉमनिक आजारानं ग्रस्त असल्यानं उपचारासाठी मदतीची आवश्यकता आहे. दानशूर लोकांकडून मदतीची अपेक्षा आहे. या कठीण प्रसंगी कितीही लहान असलेल योगदान डॉमनिकचे जीवन वाचवण्याच्या एक पाऊल जवळ आणणार ठरणार आहे. त्यामुळे डोमिनिक फर्नांडिसला क्रॉनिक किडनी डिसीजशी लढण्यासाठी निधी उभारण्यास मदत करावी असं आवाहन त्याच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आलं आहे. मदतीसाठी संपर्क या 8446513644 क्रमांकावर साधावा. गुगल पे नं. 8446513644
Bank details
Samantha Louis Fernandes
Union Bank of India
671102010007551
IFSC code UBIN0567116
Bengaluru rural branch