
दोडामार्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्गच्या अध्यक्षपदी सुधीर चंद्रकांत चांदेलकर तर नवरात्रौत्सवच्या अध्यक्षपदी आनंद निळकंठ कामत यांची एका मताने निवड झाली. गणेशोत्सव - नवरात्रौत्सव मंडळाची बैठक शनिवारी पिंपळेश्वर सभागृहात संपन्न झाली त्यात ही निवड झाली. दर तीन वर्षांनी कार्यकारणी पदाधिकारी बदल ह्या सूत्रा प्रमाणे नवीन पदाधिकाऱ्यांच्या या निवडी एकमताने झाल्या. गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षपदी विशांत सूर्यकांत परमेकर , सचिव पदी आनंद निळकंठ कामत यांची तर खजिनदारपदी उदय यशवंत मयेकर यांची फेरनिवड झाली.
अवघ्या काही दिवसानंतर सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सव २०२६ साठी देखील नवीन कार्यकारणी एकमताने निवडण्यात आली . यामध्ये अध्यक्षपदी आनंद निळकंठ कामत , उपाध्यक्षपदी सागर लक्ष्मण चांदेलकर, तर सचिव पदी रजत दिलीपकुमार राणे यांची निवड झाली.
या बैठकीला मंडळाचे माजी अध्यक्ष अजित चांदेलकर, प्रशांत केरकर, नितीन मणेरीकर, प्रवीण आरोंदेकर, रजत राणे, विशाल मणेरीकर, सुधीर चांदेलकर, विशांत परमेकर, प्रकाश सावंत, श्याम चांदेलकर आदी उपस्थित होते. यावेळी येऊ घातलेल्या नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रमा संदर्भात सविस्तर चर्चा झाली.










