
देवगड : देवगड - जामसंडे शहर विकास समन्वय समितीने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे किल्ला परिसरात गणपती विसर्जनासाठी कायमस्वरूपी विसर्जन घाट उभारण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मात्र, वेळेअभावी सध्या तात्पुरत्या स्वरूपात विसर्जनासाठी जागा तयार करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील खड्डे बुजविण्यात आले असून,दगड हटवून माती टाकत जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशभक्तांना विसर्जनासाठी काही प्रमाणात सुविधा उपलब्ध झाली आहे.
यावेळी शामल जोशी,अश्विनी मोहिते, रीमा आचरेकर, सुधीर मांजरेकर, प्रशांत खवणेकर, शरद लाड आदी उपस्थित होते. समितीच्या वतीने शिवराम निकम (वॉर्ड क्रमांक १०, किल्ला) आदी उपस्थित होते.










