LIVE UPDATES

दोडामार्ग मध्ये युती नकोच : सुधीर दळवी

जिल्हाध्यक्षांसमोरच व्यक्त केल्या भावना
Edited by: लवू परब
Published on: July 08, 2025 15:25 PM
views 265  views

दोडामार्ग : दोडामार्ग भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेबरोबर काम करण्यास इच्छुक नाहीत. आमची संघटना दोडामार्गमध्ये मजबूत आहे. यापुढच्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढवण्यास तयार आहोत, तुम्ही फक्त होकार द्या अशा भावना माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,  तसेच अतुल काळसेकर व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या समोर व्यक्त केल्यात.

यावेळी काळसेकर बोलताना म्हणाले की आपली संघटना मजबूत आहे. प्रत्येक बूथवर जाऊन काम करा, संघटना वाढवा व राहिला विषय युतीचा तर तो वरिष्ठांचा आहे. ते निर्णय काय देतील त्याप्रमाणे काम करावे लागणार असल्याचं काळसेकर यांनी सांगितलं. 

दोडामार्गात युतीत फूट..? 

राज्यात युतीचे सरकार असताना दोडामार्ग तालूक्यात भाजप शिवसेना युतीत नाराजीचे सुरु उमटाना दिसत आहेत. भाजप कार्यकर्ता बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात उपस्थित उपप्रदेशाध्यक्ष  अतुल काळसेकर व जिल्ह्याध्यक्ष प्रभाकर सावंत यांना यापुढे दिडामार्गमध्ये युती नको असं सांगितलं.