ऑर्थोपेडिक शिबिरांना दोडामार्ग - साटेली भेडशीत उदंड प्रतिसाद

मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचं आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: July 21, 2023 19:57 PM
views 73  views

दोडामार्ग : मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सलग चौथ्या दिवशी ऑर्थोपेडिक शिबिर घेण्यात आले. गुरवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय तर शुक्रवारी साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली.     

   गेले चार दिवस पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल, शिवसेना सावंतवाडी व दिपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्यावतीने हे ऑर्थोपेडिक शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे. या शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  त्यामुळे आयोजनाचे उद्दिष्ट साध्य झाल्याची भावना आयोजकांकडून व्यक्त होत आहे. या वेळी लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर्स, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकासंघटक गोपाळ गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, महीला उपजिल्हाप्रमुख  मनिषा गवस, महीला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, रामदास मेस्त्री, प्रवीण गवस, महाले, रत्न कांत कर्पे, संजय सातार्डेकर, संजय गवस, अरुण नाईक सातेली भेदशी येथे तर दोडामार्ग येथे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, डॉ. ज्ञानेश्वर ऐवाले, डॉ. रामदास रेडकर आदींसह विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.