'दोडामार्ग ते दादर' 'शिवशौर्य' यात्रेचं पालकमंत्र्यांनी केलं उद्घाटन...!

दोडामार्गात शिवशाहीचा झाला जागर|
Edited by: संदीप देसाई
Published on: September 30, 2023 19:32 PM
views 238  views

दोडामार्ग : शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष व विश्व हिंदू परिषद षष्ठीपुर्ती निमित्ताने बजरंग दल कोकणप्रांत आयोजित 'दोडामार्ग ते दादर'  'शिवशौर्य' यात्रेच उद्घाटन शनिवारी सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाल. यावेळी युवराज लखमराजे भोसले, बजरंग दलाचे कोकणप्रांत अध्यक्ष , अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उद्योजक विवेकानंद नाईक, श्रीगणेश गावडे, चेतन चव्हाण, सुधीर दळवी, गणेशप्रसाद गवस, एकनाथ नाडकर्णी, बाळा नाईक आदी उपस्थित होते.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व विश्व हिंदू परिषद अमृत महोत्सवी वाटचालीच्या अनुषंगाने आयोजित 'दोडामार्ग ते मुंबई दादर' या भव्य 'शिवशौर्य' यात्रेचा शनिवारी दोडामार्ग शहरात दिमाखदार उद्घाटन सोहळा राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरुवात झाली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कोंकण प्रांत या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या यात्रेमध्ये सातत्याने कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता हजारो शिवप्रेमी सहभागी झालेत. 

ढोलताशांच्या गजरात शिवप्रतीमा व शिवरथाचे पूजन, दीपप्रज्वलन आणि त्या नंतर झालेल्या शिवआरतीने अवघ दोडामार्ग शहर शिवमय झाल्याचे चित्र यानिमित्ताने पाहावयास मिळाले. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्ठी करण्यात आली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले हे देखील सहभागी झालेने शिवप्रेमींचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

शनिवारी सकाळी आठ वाजता येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमा झाले. सुरुवातीला शिवप्रतीमेची विधिवत पूजा अर्चा, शिवरथाचे पूजन, अभिषेक आदी विधी खास पुरोहितांकडून संपन्न झाले. त्यानंतर ही यात्रा बजापेठेतील मुख्य चौकात दाखल झाली. मुख्य चौकतही या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचांनी आणलेल्या झेंड्यांनी एक खास वाहनही सजविण्यात आले होते. यात्रेच्या सुरुवातीला यात्रा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेकानंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. तर युवराज लखमराजे भोसले यांनी शिवरथाचे व शिवप्रतीमेचे पूजन, दीपप्रज्वलन आदी  केले.


यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोसले, विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे, रत्नागिरी विभागाचे विभाग मंत्री विवेक वैद्य, यात्रेचे स्वागताध्यक्ष विवेकानंद नाईक, मातृशक्ती प्रमुख विनिता देसाई आदी उपस्थित होते. तर यात्रेचे पालक जयवंत आठलेकर, यात्राप्रमुख मनोज वझे, धार्मिक कार्यक्रम प्रमुख गुरुदास मणेरीकर, सभाप्रमुख मिलिंद नाईक, विशाल चव्हाण, निलेश साळगावकर, प्रचारप्रमुख भूषण सावंत, रामकृष्ण दळवी, निधी व यातायात प्रमुख रंगनाथ गवस, भोजन व्यवस्था प्रमुख श्रवणकुमार राजपुरोहित, यात्रामार्ग नियोजन प्रमुख संजय सावंत, सुरक्षा प्रमुख नीलकंठ फाटक, राकेश धरणे, कृष्णा नाईक हेही उपस्थीत होते. या यात्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीगणेश गावडे यांनी केलं.


युवा पिढीसाठी महाराजांचे विचार आदर्शवत - युवराज लखमराजे भोसले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनमोल विचार आजच्या तरुणांसाठी आदर्शवत असून ते त्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. महाराजांनी आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. महाराजांसाठी तेव्हाच्या समस्याही फार मोठ्या होत्या. मात्र, आता तशा समस्या नाही आहेत त्यामुळे आपल्या तरुणांनी महाराजांचे विचार आत्मसात करून आपल्या समस्या मार्गी लावावेत. शिवाय देशासाठी वेळप्रसंगी बलिदान देण्याचीही तयारी आजच्या तरुण पिढीने ठेवावी असे प्रतिपादन युवराज लखमराजे भोसले यांनी यात्रेच्या शुभारंभी बोलताना केले. 

शिवरायांचे कार्य मार्गदर्शक  - अनिरुद्ध भावे 

पूर्वीच्या काळी मुस्लिम शासक राजवटीत जी शासन व्यवस्था होती त्यामध्ये छत्रपती शिवरायांनी पूर्णत अमुलाग्र बदल केला. स्वराज्य निर्मितीसाठी अनेक तरुणांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. ज्या मातीत आपण जन्म घेतला त्या मातीची सेवा करण्यासाठीच आपले आयुष्य खर्ची घालावे हा आदर्श शिवरायांनी आपल्याला दिला असुन आताच्या व येणाऱ्या युवा पिढीने शिवरायांचे कार्य अभ्यासालाच तेच त्यांना मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे यांनी केले.

ॲड. सोनू गवस यांचा सन्मान.

दरम्यान, या शिवशौर्य यात्रेवेळी विश्व हिंदू परिषद व आयोजन समितीने हिंदू धर्म रक्षणासाठी नेहमीच पुढाकर घेणाऱ्या मराठा महासंघाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष अड सोनू गवस यांचा अनिरुद्ध भावे व विवेकानंद नाईक यांच्या हस्ते शिवप्रतिमा देवून सन्मान करण्यात आला.

शिवशौर्य यात्रेत अनेकांचा आवर्जून सहभाग

दोडामार्ग मधून सुरू झालेल्या शिवशौर्य यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांसह  सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, माजी आमदार राजन तेली, उद्योजक विवेकानंद नाईक, भाजपाचे प्रदेश चिटणीस अतूल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चाचे प्रथमेश तेली, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शहरप्रमुख योगेश महाले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अड. सोनू गवस, सचिव उदय पास्ते, माजी पं. स. सदस्य बाळा नाईक, यांसह समीर रेडकर, सूर्या गवस, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर, चंद्रशेखर देसाई, यांसह सरपंच, उपसरपंच व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.