दोडामार्ग तालुका वर्धापदिन सोहळा ; पत्रकार पुरस्कार वितरण - गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Edited by: संदीप देसाई
Published on: June 26, 2023 16:41 PM
views 114  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा व तालुक्यात दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवारी २७ जून रोजी सकाळी ११ वाजता येथील सुशिला हाॅलमध्ये संपन्न होणार आहे. 

       दोडामार्ग तालुका वर्धापन दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पार पडलेल्या दहावी  व बारावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेले तालुक्यांतील सहा विद्यार्थी व प्रत्येक शाळेत दहावीत प्रथम आलेले सर्व विद्यार्थी तसेच १०० टक्के निकाल लावणाऱ्या मुख्याध्यापकांचाही सन्मान या निमित्तानं केला जाणार आहे.  दोडामार्ग तालुका पत्रकार समिती आणि उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांच्या श्रीमती सुशिलाबाई चॅरिटेबल मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्यदिव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

       जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरिक्षक अरुण पवार, सहा. पो. निरीक्षक जयेश ठाकुर, वनक्षेत्रपाल अरुप कन्नमवार, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ,  युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी पुरस्कार प्राप्त पत्रकार व गुणवंत विद्यार्थी यांचे पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रशासकीय अधिकारी वर्ग,  सामाजिक व शैक्षणिक सह सर्वच क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, उपाध्यक्ष साबाजी सावंत, शंकर जाधव, खजिनदार रत्नदीप गवस यानी व श्रीमती सुशीलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष विवेकानंद नाईक व सर्व पत्रकार मित्र यांनी केले आहे.