दोडामार्ग शिवसेनेने केला किरीट सोमय्यांचा निषेध...!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 19, 2023 15:25 PM
views 225  views

दोडामार्ग  'किरीट सोमय्या यांचे करायचं काय ? खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देत दोडामार्ग तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने किरीट सोमय्या यांचा निषेध व्यक्त केला.     

येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, मिलिंद नाईक, महिला आघाडी प्रमुख श्रेयाली गवस, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, यांसह संदेश वरक, संदेश राणे, शिवराम मोर्लेकर उपस्थित होते.