पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय समस्या मुक्त करणार

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर यांना आश्वासन
Edited by: संदीप देसाई
Published on: January 09, 2023 17:15 PM
views 294  views

दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात भेडसावणाऱ्या विविध समस्या प्रश्न कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी येथील वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर एवळे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या रुग्णालयातील समस्या तत्काळ निवारण करण्या साठी आपण स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचे अभिवचन डॉ. एवळे यांना दिले आहे. 

   रुग्णालयात नसलेला क्लार्क वर्ग व त्यामुळे रखडणारे पगार शिवाय रुग्णवाहिकेवर नसलेला ड्रायव्हर व फार्मासिस्ट हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असून त्यासाठी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मुंबई येथे भेट घेऊन तत्काळ लक्ष वेधणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या क्लार्क, फार्मासिस्ट,रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर व रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहत दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा 90 लाखांचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती चेतन चव्हाण यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात क्लार्क उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत निघणे अवघड बनले आहे. इतकेच नव्हे तर रुग्णवाहिकेसाठी  व जनरेटर साठी लागणारा डिझेल पुरवठा  संबंधित पुरवठा दरांची बिले आजा न झाल्याने ठप्प झाला आहे. येथील वैद्यकीय अधिकारी आपल्या परीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असले तरी कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग मिळणे आवश्यक आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक सुद्धा जिल्ह्यातच अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येने अडचणींत असल्याने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला गेल्या दोन वर्षांपासून क्लार्क मिळालेला नाही. शिवाय ज्या निवासस्थानात डॉक्टर व नर्सेस राहतात त्यांची दुरावस्था झालेमुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी दोडामार्ग तालुक्यातील नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या टीमने थेट दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात जात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली. व ज्या अडचणी पालकमंत्री महोदयांकडून मार्गी लागणार आहे त्यासाठी स्वतः आपण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जातीनिशी पाठपुरावा करून दोडामार्ग तालुक्यातील जनतेला दर्जेदार रुग्ण सेवा देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करणार असल्याची भूमिका जाहीर केली. आपण स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असून निश्चित ते आपल्याला जनतेच्या या आरोग्य प्रश्नी प्राधान्याने सहकार्य करतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.


यावेळी त्यांच्या समवेतनगराध्यक्ष चेतन चव्हाण, उप नगराध्यक्ष देविदास गवस, यासह रंगनाथ गवस, प्रविण गवस, रामचंद्र मणेरकर, सुधीर पनवेलकर, नितिन मणेरकर,सुनिल गवस, समिर रेडकर, राजेश फुलारी, विशाल मणेरीकर, मनोज पार्सेकर, विशाल चव्हाण, स्वप्निल गवस, प्रकाश सावंत, शशांक नाईक आदी उपस्थित होते.