दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयच बनलं 'रुग्ण'

प्रवीण गवस यांनी छेडला ठिय्या
Edited by: लवू परब
Published on: April 15, 2025 16:31 PM
views 319  views

दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्री व स्टाफ विना रुग्णालयच 'रुग्ण' बनले आहे. स्त्रीरोग तज्ञ इतर यंत्रसामुग्री नसल्याने स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केले होते. 21 तारीखला होणाऱ्या भरती प्रक्रियेत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्टाफ भरती करणार असे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी सांगितल्यावर आजचे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

2014 साली दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. आज 10 वर्षे पूर्ण झाली मात्र डॉक्टर, नर्स, इतर स्टाफ, मशनरी या सर्व गोष्टीमुळे या रुग्णालय ओस पडलं आहे. स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे या रुग्णालयात दोन वर्षात गरोदर महिलांची एकही डिलेव्हरी झाली नाही. ही दोडामार्ग ताकलुक्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी दोडमार्ग रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केले होते. यावेळी कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी भेट देत दोडामार्ग आरोग्याविषयी आपण पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन रुग्णालयाचा प्रश्न त्यांच्या कानी घालून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असे चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी दोडामार्ग डॉ येडगे यांची त्यांनी भेट घेऊन याविषयी चर्चा केली. रुग्णालयात रिक्त जागांची माहिती द्या असे सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत दीपक गवस, पराशर सावंत, समीर रेडकर, पिकी कवठणकर, रोहन चव्हाण आदी उपस्थित होते.