दोडामार्गवासियांना 'ब्रँड ॲम्बेसेडर' पाहण्याची संधी !

शिवसेना - दीपक केसरकर मित्रमंडळाचे मोफत आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: March 11, 2024 06:36 AM
views 442  views

दोडामार्ग : मालवणी कलाकार दिगंबर नाईक यांसह नयन जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि महाराष्ट्रात कॉमेडीचा नवा ब्रँड "ब्रँड ॲम्बेसेडर" असा फेमस असलेला नाट्यप्रयोग आज सोमवारी रात्री दोडामार्ग तालुक्यातील नाट्य रसिकांना पाहायला मिळणार आहे. 

दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व शिवसेना दोडामार्ग यांच्यावतीने तालुका वासियांसाठी या नाटकाचे मोफत आयोजन केल आहे. येथील सुशिला हाॅल दोडामार्ग तिराळी रोड येथे रात्री नऊ वाजता सर्वांना मोफत कॉमेडीचा नवा ब्रँड पाहता येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दोडामार्ग वासियांनाही सावंतवाडी महोत्सव प्रमाणे दिग्गज कलाकारांच्या कलाकृती पाहता याव्या यासाठी या खास नाटकाचे आयोजन केलं आहे.

 महाराष्ट्रात मालवणी गाऱ्हाणं आणि मालवणी कॉमेडीसाठी प्रसिद्ध दिगंबर नाईक यांसह नयन जाधव, संदेश तेली, संदेश कांबळे, अनिल शिंदे, नितीन घाणेकर, उमाशंकर पाटील, श्रद्धा मोहिते या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला ब्रँड ॲम्बेसेडर हा नाट्य प्रयोगाचे  सादरीकरण होणार आहे. ही एक दोडामार्ग मधील नागरिकांना आपल्याच तालुक्यात दर्जेदार नाट्य प्रयोग पाहण्याची संधी असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आलं आहे.