तिलारी घाटातून अवैध दारू वाहतूक दोडामार्ग पोलिसांनी रोखली

धडक कारवाईत पाऊणे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
Edited by: संदीप देसाई
Published on: September 13, 2023 17:38 PM
views 110  views

 दोडामार्ग :  टाटा सुमो गाडीतून गोवा बनावटीचा बेकायदा माल बिगर परवाना बाळगून तो तिलारी घाटातून गोवा ते चंदगड वाहतूक करीत असताना दोडामार्ग पोलिसांनी कारवाई करत विजघर चेक पोस्टवर ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत 78,960 रु. दारुसह सुमारे पाऊणे दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

 विजघर चेकपोस्ट वर कार्यरत असलेले पोलीस अक्षय दत्तात्रय टिळेकर यांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून मनोज विठोबा तुपारे वय 42 वर्षे रा. पाटणे ता.चंदगड जि. कोल्हापूर, व विजय वामन कळंगुटकर वय 43 वर्षे रा. हेरे ता.चंदगड जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेत त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ देसाई करत आहेत.

  या कारवाईत Reals xxx rum कंपनीच्या गोवा बना वटीच्या दारुने भरलेल्या कंपनी सीलबंद 180 मिली मापाच्या 192 प्लास्टिकच्या बाटल्या एका बाटली ची किंमत 100 रुपये प्रमाणे मिळून किंमत सुमारे 19200, Reals xxx rum कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारुने भरलेल्या कंपनीतील बंद 750 मिली मापाच्या 24 प्लास्टिकच्या बाटल्या एका बाटली ची किंमत 250 रुपये प्रमाणे मिळून किंमत सुमारे 6000 रू., MC Dowells no 1 कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारुने भरलेल्या काचेच्या कंपनी सीलबंद 180 मिली मापाच्या 192 बाटल्या एका बाटली ची किंमत 180 रुपये प्रमाणे मिळून किंमत सुमारे 34560 रू, Royal stag कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारुने भरलेल्या काचेच्या कंपनी सीलबंद 180 मिली मापाच्या 96 बाटल्या एका बाटली ची किंमत 200/- रुपये प्रमाणे मिळून सुमारे 19200 रू. व एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो कंपनीची चार चाकी गाडी नंबर MH 42 H 2153 जुनी वापरती कि.सु. 1 लाख रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली गोव्यातून दोडामार्ग मार्गे होणारी छुपी वाहतूक रोखण्यासाठी विशेष आखणी केली असून गणेशोत्सव पार्श्वभूमीवर या कारवाई मुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.